Wednesday, February 18, 2015
'दीपक''तर पेटला पण कधी उजाडणार आहे?
तंबाखूच्या अतिसेवनामुळे महाराष्ट्राला आर. आर. पाटील यांच्यासारखा उमदा नेता गमवावा लागल्यानंतर राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने तंबाखूविरोधात आरपारची लढाई पुकारली आहे. रेल्वे स्टेशन्स, कॉलेज, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांहून तंबाखू, पान मसाला आणि गुटख्याचे उच्चाटन करण्यासाठी १० कलमी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.याचे मी स्वागत करतो.सरकारला हा निर्णय घ्यायला मोठ्या नेत्याचा बळी जावा लागला आहे.रोजच असे कितीतरी लोक कर्करोगाने मरतात त्यांच्या जीवाची किंमत सरकारच्या लेखी शून्य आहे हेही या निर्णयाने लपून रहिलेले नाही .पण हा निर्णय घेऊन कर्क रोगाचे समूळ उच्चाटन होईल मोठी क्रांती होईल असे मंत्री महोदय आणि सरकार समजत असतील तर ही केवळ भ्रांती ठरणार आहे,असे माझे स्पष्ट मत आहे.
. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याबाबत घोषणा करताना 'अॅक्शन प्लान' स्पष्ट केला आहे. 'तोंडाच्या कॅन्सरमुळे आपणाला एका ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला गमवावे लागले आहे, ही अत्यंत दुखद अशी घटना आहे. महाराष्ट्रात सध्या २ कोटी लोक तंबाखूच्या विळख्यात सापडलेले असून त्यांच्यासाठी नक्कीच आबांचा मृत्यू ही धोक्याची घंटा मानली गेली पाहिजे. या घटनेतून आपण सर्वांनीच धडा घ्यायचा असून 'तंबाखूमुक्त महाराष्ट्रा'चा विडा मी उचलला आहे', असे सावंत म्हणाले आहेत.
आरोग्य खाते शाळा तसेच अन्य शैक्षणिक संस्थावर करडी नजर ठेवणार आहे. राज्यात एकही शिक्षक तंबाखूचे सेवन करणारा असू नये, शाळेच्या आवारात वा वर्गात त्याने तंबाखूचा बार भरून जाऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात असून अशा शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश आधीच दिले गेल्याचेही सावंत यांनी नमूद केले. त्याचवेळी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्येही जागृती केली जाणार असले तरी जे पालक बाखू सेवन करतात आणि ही मुले लहान पणापासून त्यांना जर्दा ,सिगारेट,बीडी दुकानावरून विकत आणून देतात त्यांचे काय?म. गांधी देखील कुतुहला पोटी बीडी पिण्याकडे वळले होते.आज लहान मुलांना घरातच आई किंवा वडील हे या व्यसनानचे आहारी गलेले असतील तर त्यांना कसे रोकणार आहात.?कोर्टात गेलात तर बहुतेक वकील या व्यसनाचे आहारी असतात.त्यातही कुंकू लावणारे हमखास तंबाखू खाताना दिसतील अर्थात सन्माननीय अपवाद आहेत.या आधी पण पान मसाल्यावर बंदी आलेली आहे आता पानमसाल्याच्या जाहिरातींवर बंदी येणार आहे.म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करण्यास आधीच बंदी आहे. आता या बंदीची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात येणार आहे.हा सारा फार्स वाटतो कारण बंदी आली की चोरून ह्या वस्तू विकणारांची चांदी होत असते.
तंबाखू तसेच तंबाखूजन्य उत्पादनांवरील करांमध्ये वाढ करण्यासाठीही मन्त्री महोदय आग्रह धरणार आहेत. मझ्या मते आमदारांच्या खासदारांच्या धुम्रपान आणि तंबाखू सेवनावर बंदी कशी आणणार आहात ?तंबाखू विरोधी जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आता तंबाखू विरोधातही त्याच पद्धतीने जनजागृती अभियान हाती घेतले जाणार आहे. प्रभावी जाहिराती त्यासाठी बनवल्या जाणार आहेत, असेही सावंत यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्रात तोंडाच्या कॅन्सरचे निदान तसेच स्क्रिनिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अनेकांना तंबाखूचे व्यसन सोडायचे असते मात्र त्यांना योग्य ते समुपदेशन मिळत नाही. त्यासाठी विशेष समुपदेशन केंद्रं उभारण्याचीही आमची योजना आहे. त्याचवेळी टीव्ही तसेच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या पान मसाल्याच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेला 'तंबाखूमुक्त महाराष्ट्रा'चा संकल्प साकारण्यासाठी इंडियन डेन्टल असोसिएशनच्या ८ हजार डॉक्टरांनी हातभार लावण्याची तयारी दर्शविली आहे.या सर्वच गोष्टी स्वागतार्ह आहेत.पण तेवढ्यानेच कर्करोग थांबेल असे नाही कारण आपण कोणीच विषमुक्त अन्नधान्य खात नाहीत.पिके ,फळे ,भाजीपाला यांचे भरघोस उत्पादन घेऊन टीव्हीवर मुलखती देणारे आपल्या ताटात विष कालवत आहेत. अगदी आईच्या दुधातही हे विष पोचले आहे.मिळणारे प्लास्टिक बंद दुधही विषारी आहे.आधी रासायनिक खते वापरली जातात .ती खते जी विषारी विकरे तयार करतात ती प्रत्येक पिकांच्या पानाच्या पेशीत मध्ये जाऊन बसतात मग ते रोप अस्वस्थ होते ही विकरे आणि विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी ते हवेत विशिष्ट गंध संवेदन सोडून रस शोषक किडी आणि अन्य किडीना आमंत्रित करता .सर्व किडी येतात त्या रोपाच्या पेशीत अडकलेले विष शोषून घेतात रोप मोकळा श्वास घेते पण शेतकरी आपला सल्लागार असलेल्या कीटक नाशके विकणाऱ्या दुकानदाराकडे जातात . अतिशय अतिशय भयंकर विषाच्या महागड्या बाटल्या फावारायला देतात .त्या वापराचे वाढवून प्रमाण सांगतात कारण त्यांना त्याची औषध वेगाने विकायची असतात .
द्राक्ष बागायतदार सहा इंची द्राक्ष नऊ इंची करण्यासाठी त्यांच्या सल्लागारांच्या सल्ल्याने वारेमाप संजीवके फवारण्या साठी वापरतात.ती खास दिसणारी द्राक्षे आपण आणून खातो,तेंव्हा द्रक्षातील मानवी पेशींची वाढ करून कर्क रोग तयार करणार नाहीत कशावरून ?
पेप्सी,कोकाकोला ,आणखी बहुराष्ट्रीय कंपन्याच्या विषारी शीतपेयांवर आपण बंदी घालणार तर तरुण क्रिकेट सामने बघताना जाहिरातीत दाखविली जाणारी ही विषारी पेये पिल्याशिवाय रहातील काय ? जमिनीच्या पाण्यातून पिकांना वापरलेलं विषारी पदार्थ अगदी नदीनाले भूगर्भातील पाणी यांच्यात मिसळले आहेत .उजनी धरणाचे पाणी प्रयोग शाळेत तपासले तेंव्हा हे पाणी पिण्यास योग्य नाही आणि सिंचनालाही योग्य नाही असा अहवाला प्राप्त झाला आहे. कर्करोग पसरविणारी द्रव्ये अशी सर्वव्यापी झाली आहेत.
रसायनिक शेती आणि त्यापेक्षाही विषारी असलेली सेंद्रिय शेती म्हणजे शेडमध्ये तयार केलेला गांडूळ खात ,कंपोस्ट खत ,बायो डायनामिक शिंगांचा खात ,नाडेपचे खत , ही खते दिल्याने शेतात ३०ते ३६ अंश शतांश च्या वर तपमान गेले की शेंणखते गांडूळ खात ,कंपोस्ट खत ,बायो डायनामिक शिंगांचा खात ,नाडेप यांच्या वर परिणाम होऊन जमिनीतून मोठ्या प्रमाणात हरितद्रव्य वायू बाहेर पडतात .जे ओझोनच्या थराला छिद्र पडतात .या छिद्रातून सूर्य किरणांसोबत किरणोत्सर्गी अतिनील किरणे पृथ्वीच्या वातावरणात शिरतात व ती ज्या सजीवावर पडतील ,वनस्पतीवर पडतील ते सर्व 'मौत का सामान 'बनतात त्याच्यामुळे कर्करोग होतो .हे किरणोत्सर्गी अन्नधान्य खाल्याने कर्करोग थैमान घालू शकतो .तेव्हा हे सर्व टाळायचे तर कृषी ऋषी सुभाष पाळेकर यांची शून्य खर्चाची नैसर्गिक शेती करावी लागेल.रासयनिक आणि सेंद्रिय शेतीवर बंदी आणावी लागेल.हे करायला सरकारकडे इच्छाशक्ती हवी आहे. ती कोणत्याच राज्यकर्त्यांकडे नाही .कारण असे करणे म्हणजे महा विनाशकारी जागतिक शक्तीशी पंगा घेणे होय .तसा पंगा घेतला तर कोणतेच सरकार एक दिवशी टिकणार नाही .जनता कर्क रोगाने मेली तर चालेल पण सरकार बुडून कसे चालेल?
आज सर्वाधिक रासयनिक खते आणि कीटक नाशके वापरणारे राज्य आहे पंजाब त्यानंतर आपले राज्य आहे.आज पंजाबात अनेक शेतकरी कर्क रोगाने मरत आहेत. आठवड्याला एकदा जाणारी जयपूर रेल्वे याच रुग्णांनी भरलेली असते.जयपूरच्या कर्करोगावर उपचार करणाऱ्या हास्पिटल मध्ये हे सारे रुग्ण जातात त्यामुळे या एक्स्प्रेसला पंजाबात कॅन्सर एक्स्प्रेस नाव पडले आहे. आपल्या राज्यात सात लाख शेतकर्यानी आत्महत्या केल्या आहेत माझ्या मते ही हरितक्रांतीची देणगी आहे.आणि ही देणगी देणारे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ,कृषी धोरण ठरविणारे मंत्री अधिकारी हेही विषारी अन्नधान्याचे भाजीपाल्यांचे ,फळांचे सेव्न करत आहेत.हे सारेजण देशाला आणि स्वत:ला आत्मघाताकडे घेऊन जात आहेत.
या भीषण परस्थिती केवळ तंबाखूवर बंदी आणून फार काही होणार नाही.कारण तंबाखू खाणारांना संखेपेक्षा विषारी अन्नधान्य .फळे ,भाजीपाला खाणारांची संख्या या देशात अधिक आहे.तरीही दीपक सावंत यांचा निर्णय अंधेरे एक प्रकाश असा आहे.दीप पेटला तर उजेड नक्कीच होईल,पण उजाडायला अजून वेळ आहे.असे मला वाटते आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
